अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली.धक्कादायक म्हणजे शहरातील एका डॉक्टराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ५३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १३३७ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३८४ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २७७१ इतकी झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com