अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

4 years ago

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ६२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०३३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटीजेन चाचणीत २५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०१,

संगमनेर १०, आणि श्रीगोंदा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१, कर्जत ०१,

कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०९, पारनेर ०७, राहाता ०४, राहुरी ०१, संगमनेर ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०३, राहता ०१, संगमनेर ०२,

शेवगाव ०२, श्रीगोंदा ०५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १६, जामखेड ०२,

कोपर गाव ०३, नगर ग्रामीण १६, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०७, राहाता ०५, राहुरी ०१, संगमनेर ०९, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Recent Posts