महापालिका भरणार प्रदूषण मंडळाकडे एक कोटी रुपये

अहमदनगर : हरित लवादाच्या आदेशानुसार बुरुडगाव येथे बायोमिथेनायझेशन प्लांट अॉक्टोबरपर्यंत उभारण्यात महापालिकेला अपयश आले. 

याप्रकरणी हरित लवादाने एक कोटींची परफॉरमन्स गॅरंटीची रक्कम प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे भरण्याचे आदेश महिनाभरापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते.

पुढील महिन्यात लवादाची सुनावणी असून तत्पूर्वी १ कोटींची रक्कम भरणा करण्यासाठी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा एक कोटीचा दणका बसला आहे. बुरुडगाव येथील कचरा डेपो तसेच प्रक्रिया प्रकल्पाचे प्रकरण हरित लवादाकडे आहे.

महापालिकेला यापूर्वीच लवादाने बायोमिथेनायझेशन प्रकल्प उभारण्याचे आदेश मार्चमध्ये दिले होते. त्यावेळी हा प्रकल्प ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली.

त्याबरोबरच याप्रकरणी एक कोटींची परफॉरमन्स गॅरंटी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने एक कोटींची गॅरंटी प्रदुषण नियंत्रक मंडळाकडे देऊन कार्यवाहीला गती दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts