ब्रेकिंग

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बदलण्याच्या हालचाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नांसह जिल्ह्यातील प्रमुख प्रश्‍न सोडविण्यासाठी नगरचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे द्यावे,

अशी मागणी राज्य ऊसतोडणी कामगार मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी केली. या बाबत माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.

थोरे – पाटील म्हणाले, ‘‘नगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतील कामाचा ताण अधिक होत आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे नवीन पाकलमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे.

हे मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होत असले, तरी त्यांच्या गावी अनेक समस्या आहेत. या समस्या अजित पवार सोडवू शकतात.

या शिवाय त्यांना ग्रामीण भागातील अनेक बाबींची जाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न ते मार्गी लावतील. त्यामुळे नगरचे पालकमंत्रिपद पवार यांना द्यावे,.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Ajit Pawar

Recent Posts