अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर ‘मी’ निवडणूक रिंगणात!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-आजवर आपण स्व. गुलाबराव शेळके यांच्या आदर्शावर वाटचाल करून शेतकरी, कर्मचारी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढविणार असून सर्वांनी सहकार्य करा.

असे आवाहन उदय शेळके यांनी केले. शुक्रवारी उदय शेळके यांनी मांडओहळ येथे आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी १०५ मतदारांपैकी तब्बल ९६ मतदार उपस्थित होते.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आ. निलेश लंके यांच्यासह विद्यमान संचालक उदय शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल केले होते.

महानगर बँकेच्या व्यापामुळे शेळके निवडणूक लढविणार नाहीत असे सांगितले जात होते. मात्र आ. लंके यांच्यासह बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेळके यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शेळके यांनीच निवडणूक लढवावी असा आदेश दिल्यानंतर शेळके यांनी आमदार लंके यांच्या उपस्थितीत मांडओहळ येथे मतदारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करून आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts