अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- सोनई ग्रामपंचायतीवर मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई गावावर गेल्या अनेक वषार्पासूनची सत्ता आहे. यावेळी माजी खासदार तुकाराम गडाख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
ते स्वत: प्रचारात उतरले होते. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. गडाख यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. परंतु मंत्री गडाख गटाने एकहाती विजय मिळविला.