ब्रेकिंग

Ahmednagar Breaking : ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन पसार, शेअरमध्ये पैसे गुंतवले.. अहमदनगरमधील अधिकाऱ्यांच्या एजंटांचा प्रताप?

Ahmednagar Breaking : एजंटगिरी हा आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अभिशाप आहे. आज अनेक सरकारी कार्यालयांना एजंटचा विळखा आहे असे लोक म्हणतात. आता अशाच एका एजंटगिरीचा महाप्रताप समोर आला आहे.

शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने वितरित केल्या जाणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन खासगी व्यक्ती पसार झाल्याचे समोर आले आहे. परंतु यामुळे पाथर्डी तालुक्यातील १४० रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याचे कारण असे की त्यांनी सर्व पैसे त्या एजंटकडे भरणा करण्यासाठी दिले, तो एजंट संबंधित विभागाचा असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. तर तो माणूस आमचा नाहीच त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्या असे पुरवठा विभाग म्हणत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हे पैसे त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवले, मात्र त्यात तोट्यात गेल्याने सध्या हा एजंट परागंदा झाला असल्याचे म्हटले जात आहे.

 रेशन दुकानदार काय म्हणतात?

१४० दुकानदारांनी ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे सुमारे ७१ लाख रुपये एका खासगी व्यक्तीकडे दिले, मात्र त्याने ते पैसे सरकारी तिजोरीत भरलेच नाहीत. पुरवठा विभाग आता दुकानदारांना हे पैसे भरण्यासाठी तगादा करीत आहे.

मात्र, पुरवठा विभागाने नेमलेल्या खासगी व्यक्तीकडे आम्ही पैसे दिले. पुन्हा पैसे भरण्याचे कारण काय? तो माणूस सरकारी व्हॉटस् अॅप ग्रुपमध्ये कसा? त्याने व अव्वल कारकुनाने वेळोवेळी दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तालुका पुरवठा विभागाची चौकशी करण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.

चर्चांना आला ऊत

सध्या या घटनेनंतर चर्चांना ऊत आला आहे. पुरवठा विभागात त्रयस्त खासगी व्यक्तीची नेमणूक करून त्याच्यामार्फत रेशन दुकानदार आपला रेशनसाठी जमा होणारा शासकीय भरणा जमा करतात, शासकीय यंत्रणा अस्तित्वात असताना,

त्रयस्त इसमाची गरज काय? शिवाय शासकीय कार्यालयात खासगी इसम अगर एजंट नेमणे प्रतिबंधित आहे, मग कोणाच्या सांगण्यावरून पुरवठा विभागात या व्यक्तीची नेमणूक करून लाखो रुपये जमा करण्यात आले,

या घटनेतील रेशनिंगचा शासकीय भरणा त्रयस्थ व्यक्तीने ऑनलाइन सट्टा, तसेच जुगार खेळण्यासाठी वापरले अशा अनेक चर्चांना सध्या ऊत आला आहे. या सर्व नागरिकांच्या चर्चा आहेत , यात सत्यता किती हे मात्र तपासणे गरजेचे आहे.

 तहसीलदार म्हणतात त्या खासगी व्यक्तीशी काही संबंध नाही

पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांनी याबाबत संगितले आहे की, तहसील अथवा पुरवठा विभागाचा संबंधित खासगी व्यक्तीशी संबंध नाही. आम्ही कोणाकडेही पैसे देण्यास सांगितलेले नाही. तहसील कार्यालयाबाहेर दुकानदारांनी कोणाकडे पैसे दिले,

याच्याशी आमचा काही संबंध नाही. दुकानदारांनी पैसे भरावेत. तालुक्यातील अनेक दुकानदारांचे पैसे भरायचे राहिले आहेत असे तहसीलदार यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts