ग्रामपंचायतीवर सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करावी – माजी खासदार गांधी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर पक्षातील कार्यकर्ते किंवा सरकारी कर्मचारी प्रशासक नेमण्याऐवजी ग्रामसभेच्या माध्यमातून लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आली होती.

संघटनेच्या या मागणीला प्रतिसाद देत माजी खासदार दिलीप गांधी यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक ऐवजी सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे.कोरोना महामारीशी संपुर्ण भारत लढा देत आहे.

अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 16 हजार 318 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकणार नाही.ग्रामपंचायत अधिनियम कायदा 151 कलम दुरुस्ती करुन दि.13 जुलैचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात येऊन यामध्ये खाजगी व्यक्ती अथवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमणुक करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

परंतु ग्रामपंचायतीवर सरकारी कर्मचारी, पक्षीय कार्यकर्ता व खाजगी व्यक्तीची निवड न करता गावातील सोशल इंजिनियरिंगच्या माध्यमातून युवक-युवतींना संधी देऊनछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अष्टप्रधान मंडळाच्या धर्तीवर या अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यामुळे गावाचा सर्वांगीन विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था व गावाचा विकास साधणे हे प्रमुख उद्दीष्ट समोर राहणार आहे.

अशा परिस्थितीत लोकभज्ञाक ग्रामपंचायतीवर अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करुन युवकांना संधी मिळाल्यास गावांचा झपाट्याने विकासात्मक बदल होणार आहे.या मागणीसाठी संघटना प्रयत्नशील असल्याची भावना अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts