डॉ. सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार

अहमदनगर :- भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या, तरी गप्पांच्या फडात ‘तुमच्याकडे कोण चालणार’ हाच एकमेव प्रश्न चर्चेत आहे. चतूर मतदार कल जाणून घेऊ पाहणाऱ्यांचा अंदाज ओळखून उत्तर देत आहेत.

त्यामुळे कार्यकर्ते हवेत असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. 

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट केल्याने ते ऐनवेळी खेळी करणार की, पक्षाशी एकनिष्ठ राहणार हा प्रश्न चर्चेचा विषय बनलाय.

या मतदारसंघात दक्षिण भागातील शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदे, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मतदारांची संख्या सुमारे १८ लाख ५४ हजार २४८ आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत काट्याची टक्कर होत असल्याने राजकीय गप्पांचा फड रंगला आहे.

मतदारसंघातील नातेवाईक व मित्र परिवारांना एकच प्रश्न पडला आहे, तुमच्याकडे कोण चालणार? या प्रश्नांच्या उत्तरातून कार्यकर्ते कानोसा घेत आहे.

पण मतदारही कल जाणून घेणाऱ्यांची दिशाभूल करत सोयीचेच उत्तर देत असल्याने प्रत्यक्ष निकाल आल्यावरच कोण बाजी मारणार याचे उत्तर मिळणार आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts