स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने मारहाण व लूटमार

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- स्वस्तात सोने खरेदी करण्यामुळे अनेक घातक कारनामे झाल्याच्या घटना या आधीही अहमदनगरमध्ये घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा स्वस्त सोन्याच्या आमिषाने एकाला मारहाण व लूटमार झाल्याची घटना घडली आहे.

स्वस्तात सोने देण्यासाठी चौघांनी एका व्यक्तीला मोकळ्या शेतामध्ये बोलावून मारहाण केली. त्याच्या खिशातील 12 हजार रूपयांची रक्कमही काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे.

अजय विष्णू घुसळे (वय- 32 रा. सिडको एम- 7, औरंगाबाद) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहमदनगर मधील

नगर- दौंड रोडवरील पांजरपोळ (ता. नगर) पासून एक किलोमीटर असलेल्या मोकळ्या शेतात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

सुरेश जेठला काळे (वय- 38), ताई सुरेश काळे (वय- 35 दोघे रा. अरणगाव ता. नगर), आप्पासाहेब बजरंग गिर्‍हे (वय- 25)

सुखदेव म्हतारदेव वासन (वय- 50 दोघे रा. खंडाळा ता. नगर) यांच्याविरूद्ध फसवणूक, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी चौघा आरोपींना सोमवारी अटक केली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts