अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच मनपा, एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसर्या मजल्यावर लेखापरीक्षण विभाग आहे. याच लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमाराला अचानक आग लागली.
दरम्यान या आगीबाबत संशय बळावत असून याची सखोल चौकशी करून दोषीं आढळल्यास कारवाई केली जाईल असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी घटनास्थळी व्यक्त केले.