Maharashtra News : महाराष्ट्रातील एका हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगरमधील हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात ही आग लागली असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरु झाले आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.
आज पहाटे लागली आग
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीमध्ये पहाटे आग लागल्याची माहिती मिळत आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात हा कारखाना असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये पाच कर्मचारी अडकल्याचे देखील तेथील स्थानिकांनी सांगितले आहे.
रिअल सनशाईन असे या हातमोजे बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. अजूनही या आगीमध्ये काही कर्मचारी अडकले असल्याची माहिती मिळत आहे. जेव्हा ही आग लागली तेव्हा कंपनी बंद असल्याचे बोलले जात आहे. तसेच ह कामगार रात्रीच्या वेळी आतमध्ये झोपले असल्याची माहिती मिळत आहे.
आग आटोक्यात
छत्रपती संभाजी नगर येथील पोलिसांनी त्वरित आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लागलेल्या आगीत आतपर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्या त्वरित आग लागलेल्या ठिकाणी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश देखील आले आहे.
कारखान्यात अडकलेल्या चार जणांची ओळख पटली
हातमोजे बनवणाऱ्या कंपनीत लागलेल्या आगीमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी सांगितले की, अद्याप कारखान्यात पाच कामगार अडकले आहेत. आगीत अडकलेल्या कामगारांची स्थानिक नागरिकांनी ओळख पटवली आहे.
आगीत भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इक्बाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) हे कामगार अडकले आहेत.