अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- आज भाजपा नेते गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला आले होते, दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला होता.
या आंदोलनातून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मी सुध्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता.या इशाऱ्याची भाजपा आणि केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतल्याचे दिसत आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांची राळेगणसिद्धीमध्ये भेट घेतली.
आंदोलन करू नये, अशी विनंती अण्णांना केली आहे भाजपाच्या नेत्यांनी अण्णांना भेटण्याचा सपाटा लावलाय. आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी मध्ये भेट घेतली अण्णांबरोबर चर्चा करून अण्णांचे मत केंद्रीय नेतृत्व पर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं.
यापूर्वीही भाजपाच्या दोन नेत्यांनी अण्णांची या विषयावरती चर्चा केली आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील संकटमोचक म्हणून ओळख आहे. आंदोलन न करण्याची विनंती आपण अण्णांना केली आहे.
गरज पडली तर, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, मागील आंदोलनावेळी महाजन यांनीच मध्यस्थीची भूमिका बजावली होती.