Ahmadnagar Braking : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत झगडे फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका लक्झरी बसने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी (दि. २१) संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झगडे फाटा येथून चांदेकसारेच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार बाळू माळी (वय ३५) झगडे फाटा या ठिकाणी उड्डाणपुलाच्या खाली
राष्ट्रीय महामार्ग एनएच १६० आपली बजाज प्लॅटीना कंपनीची दुचाकीवर ओलांडत असताना नाशिककडून शिर्डीकडे जाणारी लक्झरी बस क्रमांक (एमएच ४० सीएम ९९८८) ने दुचाकीस्वरा जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी जवळ जवळ ५०-६० फूट फरपटत नेल्यामुळे दुचाकीस्वार जागेवर ठार झाला आहे.
लक्झरी बस ही नाशिककडून शिर्डी मार्गे अमरावतीकडे जाणार असल्याचे समजले. या बस मध्ये ६ प्रवासी होते. अपघात घडल्या बरोबर ताबडतोब आजूबाजूचे रहिवासी विश्वनाथ सोळसे, विलास चव्हाण, विलास होन हे मदतीला धावले.
सिद्धार्थ सोळसे यांनी त्वरित कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क साधला व ११२ नंबरला संपर्क करून अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. दरम्यान, घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे. व पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
एनएच १६० या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. पालखी मार्गाचे देखील काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेले आहे. तसेच झगडे फाटा येथे कोपरगाव संगमनेर या राज्य मार्गासाठी बांधलेला उड्डाणपूल हा देखील फक्त सांगाडा उभा करून अर्धवट अवस्थेत पडून आहे.
झगडे फाटा येथे कोणत्याही प्रकारची सिग्नल यंत्रणा तसेच दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरू आहे. याबाबत योग्य ती काळजी घेण्याविषयी वारंवार जनतेने मागणी करून देखील त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था केली नसल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे