अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या उर्मिला राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीवर माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.
पंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार होते.
या निवडणुकीत भाजपचे 8 व विरोधी गटाचे 3 सदस्य होते. त्यामुळे विरोधी गटाने सभापतीपदासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. ही पंचायत समिती माजी आमदार वैभव पिचड यांच्या अधिपत्याखाली आहे.
त्या मुळे पुन्हा एकदा भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. यावेळी नवनिर्वाचित सभापती उर्मिलाताई राऊत म्हणाल्या, मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांनी
माझ्याकडे कोणतेही राजकीय वलय व वारसा नसताना माझ्यासारख्या सामान्य कुटुंंबातील महिलेस तालुक्यातील सर्वोच्च सभापती पद देऊन माझा नव्हे तर संपूर्ण समाजाचा सन्मान केला आहे.
या पदाचा उपयोग मी समाजाच्या हितासाठी निश्चित करेल. माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले, एक डोळ्यात दुःख दत्तात्रय बोर्हाडे यांच्या निधनाचे व एका डोळ्यात शेतकरी महिलेला सभापती पद मिळाल्याचा आनंद आहे.
उर्मिला राऊत यांची बिनविरोध निवड झाली असली तरी ते सदस्य सोबत होते. सर्वजण यापुढे एकत्र राहून तालुक्यातील आरोग्य व विकासाच्या कामात सतर्क राहून काम करावे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com