ब्रेकिंग

ब्रेकिंग ! सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत; भाजपा डॉ. विखे यांना उमेदवारी देण्यास उत्सुक नाही

Ahmednagar News  : भारतीय निवडणूक आयोगाने नुकतेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर उद्या तीन दिवसात म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अर्थातच 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होण्याआधीच राज्यात नवीन सरकार येणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. अद्याप महाविकास आघाडी अन महायुतीने उमेदवारांची घोषणा केलेली नाही मात्र इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुक उमेदवारांकडून जय्यत तयारी सुरु आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की बाळासाहेब थोरात यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते. बाळासाहेब थोरात यांनी गेल्या आठ टर्म पासून म्हणजेच तब्बल 40 वर्षांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष बाब म्हणजे यंदाही महाविकास आघाडी कडून थोरात यांनाच येथून उमेदवारी दिली जाणार आहे.

दरम्यान थोरात यांना राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र तथा नगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आव्हान देणार असे बोलले जात होते. स्वतः सुजय विखे पाटील यांनीच संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता विजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांच्या माध्यमातून हाती आली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीयेत.

भारतीय जनता पक्ष सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा कुठलाही विचार करत नसल्याचे म्हटले जात आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची ही जागा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडे जाते. यामुळे ही जागा भाजपाला मिळणे कठीण आहे. तसेच भारतीय जनता पक्ष एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना उमेदवारी देत नाही.

पक्षाची ही भूमिका असल्यानेही सुजय विखे पाटील यांना विधानसभेसाठी तिकीट दिले जाणार नाही असे म्हटले जात आहे. एकंदरीत सुजय विखे पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा यंदा धुळीस मिळणार असे दिसत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts