समुह संक्रमणाचा धोका पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : देशभरात १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले असून एकट्या महाराष्ट्रातच यापैकी ३ लाखाचा आकडा पार झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या तर एकूणच विद्यार्थ्यांचे,

शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे समुह संक्रमणाचा धोका पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात,

विद्यार्थ्यांकडून परिक्षाशुल्क घेऊ नये आणि मागील सत्राच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करावा, या तीन मागण्या युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यभरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणूचे समुह संक्रमण सुरु झाले आहे, असा दावा विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.

असे असतानादेखील परीक्षा घेण्याचे आदेश काढणे म्हणजे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि कुटुंबीयांचे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, असे यावेळी तांबे यांनी सांगितले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts