‘ह्या’ ठिकाणी खूप स्वस्तात मिळतायेत कार ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळात कार विकत घेणे खूप सोपे झाले आहे. फायनान्स कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा हे यामागील प्रमुख कारण आहे.

याशिवाय कार कंपन्यांकडून दिली जाणारी सूट आणि कमी ईएमआय देखील ग्राहकांना मोटारी खरेदी करणे सुलभ करतात. परंतु तरीही प्रत्येकाचे बजेट कार खरेदीसाठी पुरेलच असे नाही. पण भारतातील सेकंड हँड कार बाजाराचा विस्तार झाल्यामुळे अशा व्यक्तींचे कार खरेदी करण्याचे स्वप्न आता सहजपणे पूर्ण झाले आहे.

गेल्या काही वर्षांत भारतात सेकंड हँड कारची खरेदी-विक्री बर्‍यापैकी वाढली आहे. अशी काही निवडक प्लॅटफॉर्म आहेत जिथून आपण सहजपणे सेकंड हँड कार खरेदी करू शकता. ‘कार्स24’ हे देखील त्यापैकी एक आहे. सध्या तीन फोर्ड कार अतिशय स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

फोर्ड ईकोस्पोर्ट 1.5 ट्रेंड टीडीसीआय :- फोर्ड इकोस्पोर्ट 1.5 ट्रेंड टीडीसीआय सध्या कार्स 24 वर विक्रीसाठी आहे. या कारचे 2013 चे मॉडेल तुम्हाला मिळेल, ज्याची किंमत 3.25 लाख रुपये आहे. ही कार फक्त 38,344 किमी चालली गेली आहे. फोर्ड इकोस्पोर्ट हि कार दुसरा मालक विकत आहे.

फोर्ड ईकोस्पोर्ट 1.5 ट्रेंड टाइटेनियम टीडीसीआई ऑप्ट :- फोर्डची इकोस्पोर्ट्स बर्‍याच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. कारची 1.5 ट्रेन्ड टायटॅनियम टीडीसीआय ऑप्ट कार्स 24 वर विक्रीसाठी आहे.

हे मॉडेल 2013 चे आहे. चांगली गोष्ट ही कार पहिल्या मालकाद्वारे विकली जात आहे. या कारची किंमत 3.42 लाख रुपये आहे. हि कार 1.18 लाख किमीपेक्षा अधिक अंतर धावली आहे.

फोर्ड फिगोचे डिझेल मॉडेल :- सध्या फोर्ड फिगोच्या 1.5 ट्रेंड डिझेल मॉडेलचे सेकंड-हँड मॉडेल विक्रीसाठी आहे. आपल्याला या कारचे 2016 चे मॉडेल मिळेल, याची किंमत 3.90 लाख रुपये आहे. ही कार 77,945 किमी चालली आहे. ती एक डिझेल कार आहे.

येथे देखील स्वस्त कार उपलब्ध आहेत :- कार्स24 प्रमाणेच मारुती सुझुकीचेही सेकंड हॅन्ड कार प्लॅटफॉर्म आहे. त्याचे नाव ट्रू व्हॅल्यू आहे. ट्रू व्हॅल्यू वर तुम्हाला एक से बढकर एक मारुती खरेदी करता येईल. आजही मारुतीच्या काही गाड्या येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मारुती स्विफ्ट एलएक्सआई :- मारुती स्विफ्टचे एलएक्सआय व्हेरिएंट विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे. या कारचे 2011 चे हे मॉडेल विक्रीसाठी आहे. ही पेट्रोल कार असून त्याची किंमत 2 लाख रुपये आहे. प्रथम मालक ही कार विकत आहे. हि कार 91 हजार किमी चालली आहे.

ऑल्टो 800 :- ट्रू व्हॅल्यूवर मारुतीच्या अल्टो 800 चा एलएक्सआय व्हेरियंट देखील उपलब्ध आहे. ही एक पेट्रोल कार देखील आहे, ज्याची किंमत 1.65 लाख रुपये आहे. प्रथम मालक ही कार विकत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24