अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील आत्महत्या केलेल्या किरण उर्फ अक्षय लहू पवार याने जीवे मारण्याची धमकी व दमदाटी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे.
त्यावरून सचिन मच्छिंद्र वराळ यांच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलाच्या वडिलांनी लहू शिवराम पवार
यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा (मयत) किरण उर्फ अक्षय लहू पवार हा याचे मोबाइल नंबर वरील येणारे सर्व फोन हे अचानक निघोज येथील तरुणीच्या फोनवर जात असल्याने
आरोपी सचिन मच्छिंद्र वराळ व इतर अनोळखी हे किरण (मयत) यास फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन शिवीगाळ दमदाटी करत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून किरण उर्फ अक्षय लहू पवार याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत.
दरम्यान तरुणानी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलीस पुढील तपास करणार असून इतर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे ही आत्महत्या प्रेमसंबंधातून की दमदाटी व मारहाण केल्यामुळे झाली याबाबतची चर्चा आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved