अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात करोना वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
आतापर्यंत एक अधिकारी व सात कर्मचार्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी कर्मचारी धास्तावले आहेत.
करोना रुग्ण वाढत असल्याने तीन दिवसांपासून कामकाजावर परिणाम झाला आहे.कोरोना संख्या वाढू नये म्हणून सॅनिटायझर करणे, अधिकारी, कर्मचार्यांची दररोज ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करणे,
लक्षणे दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.शुक्रवारी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार आहे.
पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांनी करोना चाचणी करून घ्यावी, फिर्याद दाखल करण्यासाठी एक किंवा दोनच व्यक्तींनी यावे, अशा सूचना पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved