त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम

अहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ व घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

…तर हा हल्ला झाला नसता

 

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, महापौर निवडणुकीच्यावेळी मला पोलिस संरक्षण देण्यात आले. मात्र सदरचे अंगरक्षक सभागृहात उपस्थित न राहता सभागृहाबाहेर थांबले. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला केला तेव्हा जर अंगरक्षक तेथे असते तर हा हल्ला झाला नसता. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts