ॲट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ या तालुक्यात बंद !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-आंबीजळगाव येथे ॲट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ दि ११ ऑगस्ट रोजी कर्जत शहर बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

आंबिजळगाव खातगाव रस्ता बंद केल्याच्या कारणावरून सचिन शेटे यांनी आंबिजळगाव येथील तीन शेतकऱ्यांवर हरिजन एक्ट चा खोटा गुन्हा दाखल केला आहे

या घटनेचा जाहीर निषेध करत सकल मराठा समाज यांच्या वतीने हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून

खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी अत्यावश्यक सेवा वगळता कर्जत शहर बंदचे आयोजन करण्यात आले आहे सदरचे निवेदन कर्जत तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले

असून यावेळी सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक तानाजी पाटील, नानासाहेब धांडे, अँड धनराज राणे, अँड दीपक भोसले, राहुल नवले, श्रीराम गायकवाड,

राम तोरडमल, विजय मोरे, सुनील यादव, डॉ. नितीन तोरडमल, महेंद्र धांडे, प्रसाद कानगुडे, सुदाम निकम, कुंडलिक निकम, दीपक यादव, अविनाश जाधव, आदींसह अनेक जण उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts