अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-नगर शहरासह जिल्हयामध्ये कोवीड रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. शहरामध्ये देखील रूग्ण संख्या वाढत असल्यामुळे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी कोवीड रूग्णांवर उपचार होण्यासाठी तीन ठिकाणी कोवीड सेंटर सुरू केले.
या ठिकाणी रूग्णांना चहापाणी, नाष्टा, दोन वेळेस जेवण आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी करण्यात येणा-या उपचारामुळे रूग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे साहेब हे वेळोवेळी या कोवीड सेंटरला भेट देवून रूग्णांची व त्या ठिकाणी काम करित असलेल्या कर्मचा-यांची, डॉक्टरांची विचारपूस करतात.
त्यामुळे कोवीड सेंटरमध्ये काम करित असलेल्या कर्मचा-यांचे मनोधौर्य वाढत आहे. रूग्णांची संख्या पाहता लवकरच आणखी एक कोवीड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
तसेच संपूर्ण जिल्यातून कोवीड प्रादुर्भाव रूग्ण मयत झाल्यास तो जिल्हयातील असला तरी अहमदनगर अमरधाम येथे त्यांचा अंत्यसंस्कार होतो.
त्यामुळे नालेगांव अमरधाम येथील विद्युत दाहिनीमध्ये दिवसभरात 10 मयत अंत्यविधी करण्याची मर्यादा आहे. परंतु एखादया दिवशी जास्त रूग्ण मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी करण्याचा रूग्णांच्या नातेवाईकाचा आग्रह असतो
अशा वेळी नाईलाजाने अमरधाम मध्ये अंत्यविधी करण्यात येतो. मयत झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरलेली असते
तसेच मोठया मानसिक तनावात ते असतात अशा वेळी अंत्यविधी करण्यास उशीर झाल्यास त्यांच्यावर काय परिस्थिती असेल याचे भान श्री पाटोळे यांना असल्याचे दिसून येत नाही्.
वास्तविक पाहता श्री पाटोळे हे कोणत्याही कोवीड सेंटरला तसेच सिव्हील हॉस्पीटल तसेच अमरधाम येथे फिरकले देखील नाही.
आपण काय बोलतो याचे त्यांना भान नाही. त्यामुळे त्यांची मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांचेवर टिका करण्याची लायकी नाही.
वास्तविक पाहता त्यांनी टिका करण्यापेक्षा कोवीड रूग्णांना कशी मदत करता येईल याचे अवलोकन करावे. असे श्री पुष्कर कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved