अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पाथर्डी शहरात कोरोनाचा कहर वाढतच असुन सत्तावीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत.
त्यामधे शहरातील एका कपड्याच्या व्यापा-याच्या घरातील तेराजण, वाळुंज -तिन , नाथनगर-चार, कारेगाव,पागोरी पिंपळगाव, मढी वामनभाऊ नगर – प्रत्येकी एक व शहरातील -एक ,रंगार गल्ली -एक या रुग्णांचा समावेश आहे.
शेवाळे गल्लीतील मृत झालेल्या महीलेचा अहवालही पाँझीटीव्ह आला आहे. शहरात लाँकडाऊन उघडले आणि नागरीकांची गर्दी वाढली. तसेच शहरातील प्रत्येक भागात कोरोनाने शिरकाव केला आहे.
लाँकडाऊन काळात शहरात नागरीकांनी नियम पाळले. लाँकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही. दोन दिवस शहरातील वैद्यकीय व्यवसायीकांनी व आरोग्य विभागाने शहरात आरोग्य तपासणी मोहीम राबविली.
लाँकडाऊन संपले आणि कोरोना गेल्याच्या भावनेतुन शहरात खुपच गर्दी वाढली. सोशल डिस्टन्स कुठेही पाळताना दिसत नाहीत. प्रशासनही हतबल झाले आहे.
पोलिस व पालिका कर्मचारीही कुठपर्यंत कारवाई करीत राहतील. नागरीकांनी समजुन घेवुन नियम पाळले नाही तर शहरातील कोरोना बाधीतांची साखळी आणखी वाढतच जाणार आहे.
कोरोनाची तपासणी करण्यावरही मर्यादा येत आहेत. आता स्वतःची काळजी स्वतः घेणे यापेक्षा दुसरा उपाय राहीला नाही. हे चक्र थांबले नाही तर परस्थीती हाताबाहेर जाईल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com