कोरोनाचा अहमदनगर जिल्ह्यात विस्फोट: एकूण रुग्ण झाले @500 !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  शहरासह जिल्ह्यात बुधवारी दि. 1 रोजी 10 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात नगर शहरातील सात जणांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १० तर दुपारी २५ असे एकुण ३५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 500 झाला आहे,नगर शहरात आतापर्यंत तब्बल 174 रूग्ण कोरोनाबाधीत आढळले आहेत. जिल्ह्यातील हा आकडा सर्वाधिक असून त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात 107 रूग्ण आहेत.

  • आत्तापर्यंत ३१२ जणांना मिळाला डिस्चार्ज.
  • आत्तापर्यंत १४ रुग्ण दगावले
  • सध्या (ॲक्टीव) असलेले १७४ रुग्ण उपचार घेत आहेत.
  • आज दुपारपर्यंत ५०० रुग्णांची नोंद झाली आहे

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा १० कोरोना बाधित रुग्ण

नगर शहर ७,अकोले तालुका २,संगमनेर तालुक्यातील १ रुग्ण आहेत.

  • नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष कोरोना बाधीत
  • सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला कोरोना बाधीत.
  • पद्मानगर येथील ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ११ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षाचा युवक कोरोना बाधित आढळून आले आहेत.
    हे सर्वजण बाधित व्यक्तींच्या संपर्कातील आहेत.
  • अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील २६ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवतीही कोरोना बाधित आढळून आली आहे.
    हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते.
  • संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ३५ वर्षीय युवक कोरोना बाधित.
    हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज दुपारी वाढले पुन्हा २५ कोरोना बाधित रुग्ण

आज दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहे.नगर शहरातील १४, राहुरी तालुका ४, बीड जिल्हा १, पाथर्डी तालुका १, कोपरगाव ३, राहाता तालुका १, श्रीरामपूर येथील १ रुग्ण

  • नगर शहरातील तोफखाना भागातील १० रुग्ण
    ३५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महीला, ५५ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महीला, ५७ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महीला, ३३ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय युवक, ७ वर्षीय बालीका व २ वर्षीय बालीकेचा यात समावेश.
  • ढवणवस्ती येथील २ रुग्ण
    ३५ वर्षीय महीला व १२ वर्षीय मुलाचा यात समावेश.
  • केडगाव येथील २ रुग्ण
    केडगाव येथील ५३ वर्षीय पूरुष व भूषणनगर येथील ४६ वर्षीय महीलेचा यात समावेश.
  • राहुरी तालुक्यात ४ रुग्ण
    केसापूर येथील ४५ वर्षीय पूरुष, ४० वर्षीय महीला व १९ वर्षीय युवकाचा यात समावेश.
    तसेच वांबोरी येथील ४४ वर्षीय पुरुष कोरोना बाधीत.
  • बीड जिल्ह्यातील १ रुग्ण
    शिरुर कासार, तरडगांव, जिल्हा बीड येथील ३६ वर्षीय पुरुष कोरोना बाधित.
  • पाथर्डी येथील १ रुग्ण
    पाथर्डी मधील वामनभाऊ नगर येथील ३४ वर्षीय पुरुष कोरोना बाधित.
  • कोपरगांव येथील ३ रुग्ण
    कोपरगाव मधील श्रीकृष्णनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, ओमनगर येथील ७२ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय पुरुषाचा यात समावेश.
  • राहाता तालुक्यात १ रुग्ण
    शिर्डी येथील ५९ वर्षीय पुरुष कोरोना बाधीत.
  • श्रीरामपुर तालुक्यात १ रुग्ण
    खैरी निमगाव येथील २३ वर्षीय महीला कोरोना बाधीत.
  • याप्रमाणे आज दुपारी २५ रुग्ण कोरोना बाधित

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts