अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जगाबरोबर भारत देशात कोरोना वाढला असून, यात महाराष्ट्र तसेच अहमदनगर जिल्हा शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
यात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.
शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण संख्येचीच आकडेवारी समोरे येत असून शहरातील मोठमोठ्या खाजगी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या संख्येची नोंद होत नसून तसेच हजारो रुग्ण महागड्या खर्चाच्या भितीने घरीच कोरोनाचे उपचार घेत आहेत.
याचा मोठा परिणाम शहरातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने होणार्या वाढीवर होत आहे. सुरुवातीचे काही दिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे आजारावर बारकाईने लक्ष देणारे जिल्हाधिकारी आता दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे.
शहरातील खाजगी दवाखान्यातील कोरोना रुग्णांचे संपर्कात आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करणे गरजेचे असून, या रुग्णांच्या घराजवळ संपूर्ण परिसर सॅनिटाईज करणे गरजेचे असून, यासर्व गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी प्रभागनिहाय नेमलेल्या समितीचे कार्य बंद असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे जाणवत आहे.
खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांची नोंद होऊन ते रहात असलेल्या भागात या समितीने जाऊन तेथील परिसराचे व रुग्णांचे संपर्कात आलेल्यांची नोंद घेऊ योग्य उपाय योजना करणे गरजेचे आहे.
जेणेकरुन कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यात यश येईल, असे पत्रकार भाजपा शहर व जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख हाजी अन्वर खान यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved