अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज संध्याकाळ पर्यंत एकाच दिवसात रेकोर्ड ब्रेक 43 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आज सकाळच्या सत्रात १० दुपारनंतर १९ व १४ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या ४६५ झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
याशिवाय, पीएमटी लोणी आणि पुण्यातील खाजगी प्रयोगशाळा याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १४ रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे.
यामध्ये दाढ (ता. राहाता) ०७, संगमनेर ०१, कोल्हार ०३, मजले चिंचोली (ता.नगर) ०१ आणि सारसनगर (नगर शहर) ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
सारसनगर आणि मजले चिंचोली येथील रुग्ण पुणे येथे उपचार घेत आहेत तर दाढ आणि कोल्हार येथील रुग्ण पीएमटी लोणी येथे उपचार घेत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews