अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे. आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे.
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३२२ इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ इतकी झाली आहे.
दरम्यान, आज ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ७७३ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
आज सकाळी ३२ जणांचे अहवाल बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील ११, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६ आणि श्रीगोंदा तालुक्यातील ५ जणांचे अहवाल बाधित आढळून आले.
दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ जणांचे अहवाल बाधित आढळून आले. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील १० (पाथर्डी शहर ०८, कोल्हूबाई कोल्हार ०२),
भिंगार येथील ०२, नगर तालुक्यातील ०१ (घोसपुरी) आणि राहुरी तालुक्यातील ०४ (राहुरी फॅक्टरी ०३, म्हैसगाव ०१) जणांचे अहवाल बाधित आढळून आले.
सायंकाळी ६५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले यामध्ये पारनेर ०४ (सिध्देश्वर वाडी ०३, खडक वाडी ०१) पाथर्डी ३२ (आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ०९, तिसगाव ०३, त्रिभुवनवाडी ०४, खाटीक गल्ली पाथर्डी 14), कोपरगाव ०८ (सूरेगाव),
नेवासा ०१ (शिरसगाव), नगर ग्रामीण १३ (नागापूर ०२, पोखर्डी ०८, देऊळगाव ०१, सांड सांडवा ०२), नगर शहर ०२, जामखेड ०३ (दिघोळ ०२, लहाने वाडी ०१) आणि श्रीगोंदा ०१ (घोगरगाव), संगमनेर खुर्द ०१, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com