अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : जिल्ह्यातील कोव्हिड-१९ रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन येथील सुरभि हॉस्पिटलने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरील अद्ययावत उपचारांसाठी ४ खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग व ३० खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.
असा कक्ष सुरू करणारे ‘सुरभि’ हे जिल्ह्यातील दुसरे खाजगी मल्टिसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या कक्षामध्ये रुग्णांना शासनाने ठरवून दिलेल्या दरांमध्येच उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘सुरभि हॉस्पिटल्स प्रा.लि.चे’ कार्यकारी संचालक डॉ. राकेश गांधी यांनी दिली.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापुसाहेब गाडे यांनी भेट देऊन पाहणी केली व उपलब्ध असलेल्या सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.
या अतिदक्षता विभागात ४ व्हेन्टिलेटर्स, ४ मल्टिपॅरा मॉनिटर्स, बेड साइड ट्रॉलीज, डीफ्युब्रुलेटर्स, टेम्पररी पेसमेकर, नेब्युलायझर यासह कोव्हिड रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागातील प्रत्येक रूग्णांवर सीसीटीव्ही कॅमेरातून लक्ष ठेवले जाणार असून तेथे मायक्रोफोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे रुग्णाचे संभाषण आणि हालचालींवर देखरेख ठेवली जाणार आहे.
नर्सिंग स्टेशन समोर स्वतंत्र मॉनिटरची व्यवस्था केली असून त्याद्वारे दोन्ही कक्षातील रुग्णांकडे विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. सुरभि हॉस्पिटलचे संचालक फिजिशियन डॉ. प्रियन जुनागडे या कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews