अहमदनगरमधील एसीसीएस (आर्म्ड कॉप्स सेंटर अँड स्कूल) या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातील दोघे उत्तर प्रदेशचे तर, एक पारनेर तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्याकडे बनावट मिलिटरी कार्ड आढळून आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
प्रदीप सीताराम शिंदे (डिकसळ, पारनेर) रिझवान एजाज अली व सोनू नायजुद्दीन चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हे तिघे गुरुवारी दुपारी संशयितरित्या नगरच्या एसीसीएस सेंटरच्या परिसरात फिरताना आढळले. लष्करी जवानांनी यांना लगेचच पकडले. त्यातील शिंदे याच्या अंगावर लष्करी ड्रेस व बनावट कागदपत्रे होती. रिझवान व सोनू हे दोघे यूपीतील मुझफ्फरनगरचे आहेत. तिघांनाही भिंगार कम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.