राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अंडा गँगच्या प्रमुखावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

अहमदनगर : पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील वाळूतस्कर अवैध व्यावसायिकांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरसेवक समद वाहब खान (वय ४७ वर्षे रा.मुकुंदनगर) व शेहबाज उर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान (वय ३२ वर्षे रा.सदर) यांना ताब्यात घेवून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, पोलिस अधीक्षक इशु सिंधु यांनी जिल्हातील वाळू तस्करांसह अवैध व्यावसायिक तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देत. अशा गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेवून समद वाहब खान व शेहबाज उर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान या दोघांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देवून या दोघांना स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आता हे दोघेजन दि.१५ जून पासून १ वर्षाच्या कालावधीसाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. या दोघांवर कॅम्प पोलिस स्टेशन, कोतवाली पोलिस स्टेशन, तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांअंतर्गत एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक इशु सिंधु यांचे मार्गदर्शन व सुचना तसेच अपर पोलस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार,

सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे,पोकॉ.किरण जाधव, पोकॉ.सूरज वाबळे, तसेच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजपूत व महिला पोलिस कर्मचारी वैशाली गायकवाड यांनी ही कारवाई केली.

तसेच आगामी काळात वाळूमाफीया,हातभट्टी दारू,अवैध व्यावसायिक, झोपडपट्टी दादा यांच्या विरूध्द मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत पोलिस अधीक्षक इशु सिंधु यांनी दिले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts