ब्रेकिंग

टोरेसच्या कार्यालयातून कोट्यवधींची रोकड जप्त ; फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून धाडसत्र

१० जानेवारी २०२५ मुंबई : गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम स्वीकारून फसवणूक करणाऱ्या टोरेस ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीविरोधात गुन्हा दाखल होऊन तपास हाती येताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कंपनीच्या कार्यालयांसह आरोपींच्या निवासस्थानांवर छापेमारी केली. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेने तीन कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आणि महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले.

प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनी आणि कंपनीचा संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तौफिक रियाझ ऊर्फ जॉन कारटर, जनरल मॅनेजर तानिया कॅसाटोवा, स्टोअर इन्जार्च व्हॅलेंटिना कुमार यांनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी खारमधील रहिवासी भाजी विक्रेते प्रदीपकुमार वैश्य यांची फिर्याद नोंदवून घेत एकूण १३ कोटी ४८ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

संचालकांच्या घरीही छापे

गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याने प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले असून, आर्थिक गुनोचे उपयुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्या नेतृत्वात १४ अधिकानांची पथके तपास करत आहेत.

आर्थिक गुन्हें शाखेच्या पथकांनी टोरेसच्या दादर येथील कार्यालयासमा पावर, ऑपेरा हाऊस आणि लोअर परळ येथील कार्यालये आणि तानिया कैसाटोपा हिच्या कुलाबा, सर्वेश सुर्वे याच्या डोंगरीतील उमरखाडी आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को हिच्या डोबिवली येथील निवासस्थानावर छापेमारी केली.

तिघांना अटक

प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टोरेस बँडमधील फसवणुकीप्रकरणी जनरल मॅनेजर तानिया कैसाटोषा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन भारतीय नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली.

तानिया (५२) पाच वर्षांपासून कुलाबा परिसरात राहायची, तर पहलेटिना (४४) १५ वर्षापासून डोचिवली परिसरात राहते.जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को हे कंपनीचे संस्थापक आहेत. व्हिक्टोरिया ही युक्रेनची नागरिक असल्याची, तर कार्टर आणि तौफिक रियाज तावरेही एकच व्यक्ती आहे.

भेट म्हणून दिल्या कार

टोरेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अनेक महागडे गिफ्ट देण्यात येत होते.मोठी रक्कम गुंतवणाऱ्यांना महागडी कार भेट माणून देण्यात येत असे.अशा १५ कारचे वाटप कंपनीने गुंतवणूकदारांना केल्याची माहिती आहे. तर अजून पाच गुंतवणूकदारांना महागडी कार देण्यासाठी बुक करण्यात आल्याचे या छापेमारीत स्पष्ट झाले.

पोलिसांवरही कंपनीचे लक्ष ?

अभिषेक गुप्ताला शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणल्यानंतर टोरेसच्या इन्स्टाग्रामवरील खात्यावर अवघ्या काही मिनिटांत त्याचा पोलीस ठाण्यातील व्हिडीओ शेअर करण्यात आला, त्यात अभिषेक पोलिसांना गिफ्ट घेऊन आल्याचे म्हटले आहे.

तसेच जास्तीत जास्त जणांनी पोलीस ठाण्याबाहेर जमण्याचे आवाहन करण्याबरोबरच ही पोस्ट कायरल करण्याच्या सूचनाही त्यात दिल्या जात आहेत, त्यामुळे त्यांना ही माहिती कशी आणि कुठून मिळते ? हाही चौकशीचा भाग आहे.याबाबत सायबर पोलिसांचे विशेष पथक काम करत आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni