अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चित्र सर्वत्र पाहावयास मिळाल्याने कोरोना संपला की लॉकडाऊन उठविले असा प्रश्न निर्माण झाला.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी सुमारे २ महिन्यानंतर आपले व्यवसाय पुन्हा सुरू केले.
तसेच नागरिकांनी देखील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र आज पहिल्याच दिवशी दिसून आले. नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करत सामाजिक अंतराचे भान विसरून गेल्याने शोषलं डिस्टन्सचाफज्जा उडाल्याचे दिसून आल्याने या गर्दीमधून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असून,
अनेक नागरिकांकडून या बाबत भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील लोकांना कोरोना संपला का टाळेबंदी संपली याचे कोणत्याही प्रकारचं भान राहिलेले दिसत नसल्याचे चित्र श्रीगोंदा शहरासह तालुक्यात पाहण्यास मिळाले.