राहुरी :- वाळलेल्या झाडाची फांदी चालत्या दुचाकीवर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी धामोरी राहुरी स्टेशन रस्त्यावर ही घटना घडली.
शकुंतला धोंडिराम उगले (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलाबरोबर दुचाकीवरून प्रवास करत होत्या. अचानक त्याच्या दुचाकीवर वाळलेल्या झाडाची फांदी पडली.
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रंगनाथ उगले याच्या खबरीवरून राहुरी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.