अहमदनगर : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंद झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे, तरी कक्षाचे कामकाज पूर्ववत सुरू करून गरीब रुग्णांना तातडीने मदत देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी फुले ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे.
राज्यातील हजारो गरीब रुग्णांना या कक्षामार्फत वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळत होती. परंतु या कक्षाचे कामकाज स्थगित झाले आहे.