Ahmednagar breaking : अहमदनगर मधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, संस्थेला वकिला मार्फत नोटीस देण्यात आली आहे.
अशी माहिती पत्रकार परिषेदेत वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, हेमंत मुळे, अनिल गट्टाणी, मंदार मुळे यांनी दिली. वसंत लोढा म्हणाले की, हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील नगर मनमाड रोड लगतची बहुमुल्य मिळकत
काही विश्वस्तांनी संगनमताने सदर जागेचा ४० वर्षांचा करार शिल्लक असताना तसेच त्या जागेची सरकारी किंमत ३२ कोटी रुपये व बाजार भाव ४०० कोटी रुपये असताना फक्त २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत बेकायदा ठराव घेतला.
याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली असून ही जागा जाऊ देणार नाही वक्फ बोर्डाकडे या जागेची नोंद असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या आहेत
या विरोधात आवाज उठवल्यानंतर शहरातील अनेक प्रकरणे आली आहेत त्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत. चव्हाण म्हणाले कि, ही जागा देवस्थान इनामी जमीन असल्याने विक्री होऊ शकत नाही तसेच सध्या असलेल्या मंडळाच्या बॉडीला धर्मादाय आयुक्तांनी चेंज रिपोर्ट मंजूर केला नाही त्यामुळे त्यांना व्यवहार करता येत नाही.
पहिले या जागेबाबत पोलीसात फिर्याद दिली व नंतर ६ महिन्यात पदाधिकारी जागेचा ताबा सोडायला तयार झाले. आम्ही सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग मागितले तरी ते अजून लिहले गेले नाही आम्ही आता हा जागा वाचवण्याचा लढा सुरु केला आहे.