कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :   कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

तसेच, नगर शहरात सध्या पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेता नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

पुन्हा सक्तीचे लॉकडाऊन टाळायचे असेल तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक असेल तर चेहऱ्यावर मास्क घालून घराबाहेर पडावे.

कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. रुग्ण बरे झाल्यानंतर १० दिवसानंतर आणि २८ दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा.

तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांचे समुपदेशन करून याचे महत्व पटऊन द्यावे, असेही ते म्हणाले. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात.

प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात.

यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांनी यासाठी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवान त्यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24