अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात दहशत परवलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीतही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काेरोनाच्या भीतीने लोक घरातच थांबणे पसंत करत आहे. शिर्डीत कोरोनासंबंधीची जनजागृती सरकारने करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शिर्डी ग्रामस्थांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला.यानंतर आतापर्यंत सुमारे 16 देशांमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे. साऊथॅम्प्टन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार थायलंडमध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे.
या यादीत जपान दुसऱ्या आणि हाँगकाँग तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दहा, ब्रिटन 17 तर भारत 23 व्या क्रमांकावर आहे.चीनमधून बाहेर पडून जगभर धडकी भरवणारा कोरोना विषाणू आता भारतातही वेगाने पसरत चालला आहे.
दोन दिवसांत १० नवे रुग्ण आढळले. मंगळवारी आग्रा येथे कोरोनाबाधित ६ लोक सापडले. सोमवारी दिल्ली, हैदराबाद आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता.
आग्रा येथे जे ६ रुग्ण सापडले, ते एक दिवस आधी दिल्लीत आढळलेल्या काेरोना रुग्णासोबात इटलीला गेले होते. या सहा जणांना एकाच व्यक्तीद्वारे बाधा झाली असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, ज्या विमानाने ही व्यक्ती आली त्याच्या क्रूचीही तपासणी झाली.
केरळमध्ये तीन रुग्ण आढळले होते. ते आता पूर्णपणे बरे आहेत. अशा प्रकारे देशात कोरोनाची एकूण १३ प्रकरणे समोर आली आहेत.दरम्यान, नोएडामध्ये एका मुलाच्या पित्याला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी येताच दोन शाळा बंद करण्यात आल्या.
कोरोना व्हायरसवर अद्यापही उपाय शोधला गेलेला नाही. त्यासाठी कोणत्याही अधिकृत उपचाराचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com