अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : सोनईमध्ये एका 54 वर्षीय नोकरदाराचा मृत्यू झाला. हा औरंगाबादमधील गंगापूर भागातून आलेला असल्याने त्याच्या मृत्यूबाबत विविध शंका कुशंका घेण्यात येत आहेत.
त्या संशयास्पद मृत्यू झालेल्या इसमाचा जेथे जेथे संपर्क आला अशा 22 व्यक्तींचे स्त्राव शासकीय लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अधिकृत अहवाल बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला नव्हता.
तसेच करोना संसर्गाच्या भीतीने घबराट निर्माण झाल्याचे पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने बुधवार 8 जुलैपासून सोनई येथील बाजारपेठा व व्यवहार बंद करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घोषित केला.
दिवसभर सर्व बाजारपेठा आणि व्यवहार पूर्णपणे बंद होते तसेच यापूर्वी रस्त्यावर दिसणारी गर्दी बर्याच प्रमाणात कमी झाल्याचे जाणवले.
ग्रामपंचायतीचे ध्वनिक्षेपकावरुन बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या होत्या.
ज्या गल्लीत मृत व्यक्तीचे दहा-पंधरा दिवस वास्तव्य होते तेथे येणारे व जाणारे रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले असून प्रशासनाच्या स्थानिक अधिकारी, तलाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews