अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत.
शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. शहरात जास्त वाढ होऊ लागल्याने शहरात आठ दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान काल (रविवार) जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता.
मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. शहरातून जाणाऱ्या श्रीरामपूर-नेवासा फाटा रस्त्याने तुरळक वाहने दिसत होती.
दरम्यान, तालुक्यात रविवारी नव्याने २६ नवीन रुग्ण आढळून आले. या रुग्णांत नेवासा शहरातील नऊ, सोनई येथील पाच, घोडेगाव येथील तीन, उस्थळ दुमाला येथील पाच,
सलाबतपूर येथील एक, खेडलेकाजळी येथील दोन व भेंडा बुद्रुक येथील एकाचा समावेश आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार एकूण रुग्ण संख्या ३६७ वर गेली असून २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved