अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी… जाणून घ्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- अहमदनगर शहरात सातत्याने कोरोना रुग्ण वाढ कायम असून यामुळे शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने एक जूनपर्यंत वाढविले असून वेळेची मर्यादा घालून भाजीपाला, किराणा दुकाने खुली ठेवली आहेत. 

आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भात आदेश लागू केला आहे. एक जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

आदेशानुसार फक्त खालील गोष्टी सुरु असतील – 

  • वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने
  • अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप
  • घरपोहोच गॅस वितरण सेवा
  • सर्व बँका सुरू राहतील.
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री : सकाळी ७:०० ते ११:००
  • पशुखाद्य विक्री : सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.

कृषी विषयक दुकाने (विक्री दुकाने), कृषी सेवा केंद्रे : सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आणि पुरवठा वाहतूक सकाळी ११.०० ते दुपारी १.०० सुरु राहील.

कोरोना विषाणू नियमाचे उल्लघंन केल्यास प्रथम पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. दुस-यावेळेस पाच रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाईल.

किराणा दुकाने : सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत सुरु राहील. पुरवठा वाहतूक सकाळी ११.०० ते दुपारी १.०० सुरु राहतील.

कोरोना विषाणू नियमाचे उल्लघंन केल्यास प्रथम १० हजार रुपये दंड अकारला जाईल. दुस-यावेळेस १० हजार रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाईल.

भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री : सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत सुरु राहील. कोरोना विषाणू नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

दुस-यावेळेस एक हजार रुपये आकारुन माल  जप्त केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत भाजी / फ़ळे एका जागेवर लावून विक्रि करता येणार नाही, असे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

अंडी, मटन, चिकन व मत्स्य खरेदी-विक्री : सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत सुरु राहील. नियमाचे उल्लघंन केल्यास पाच हजार  दंड अकारला जाईल. दुस-यावेळेस तेवढाच दंड  आकारुन माल जप्त करुन दुकान सील केले जाईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24