ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmadnagar Breaking : शेतात विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय शेतकरी तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी- लिंपणगाव परिसरात झाली. अमोल दत्तात्रय दळवी (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (दि.१८) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास काष्टी येथील अमोल दत्तात्रय दळवी हा तरुण काष्टी लिपणगाव परिसरातील शेतातील विहिरीवर असलेली पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेला असता, तेथील विजेच्या खांबातकरंट उतरल्याने अमोल दळवी या तरुणाला विजेचा जोरदार धक्का लागल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.

त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, २ लहान मुले असा परिवार आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अभिजित दळवी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दळवी यांच्या सारख्या तरुण शेतकऱ्याचा असा मृत्यू झाल्यामुळे काष्टी लिंपणगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts