अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तू लग्न केले, तर सासरच्या लोकांना आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडिओ दाखवेन, अशी धमकी देत वारंवार अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रवींद्र मधुकर लोखंडे (चिखलठाण वाडी, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील मांजरी येथे प्रशिक्षण घेत असताना पीडित महिला व आरोपीची ओळख झाली.
रवींद्र याने मैत्री वाढवत पीडित महिलेला जानेवारी २०१७ मध्ये चिखली घाटात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याचे फोटो व व्हिडीओ काढला. त्यानंतर श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू, नगरमधील साईबन, चिखली घाट अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या महिलेवर वारंवार अत्याचार केले.
तू लग्न करू नकोस; अन्यथा आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडिओ तुझ्या सासरच्या लोकांना दाखवेन, अशी धमकी रवींद्र पीडित महिलेला देत असे.
अखेर या जाचाला कंटाळून पीडित महिलेने तोफखाना पोलिस ठाणे गाठले. तिने फिर्याद दिल्यानंतर आरोपी रवींद्र याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुंडे करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com