Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटना मागिल काही दिवसात समोर आल्या आहेत. आता एक धक्कदायक घटना नगर शहरातील नालेगावमधून समोर आली आहे. आरोपीने आधी पत्नीला मारले,
आजीला मारहाण केली नंतर चुलत्यावर कोयत्याने वार केल्याची घटना सोमवारी (दि. 2) सकाळी 11 घडली आहे. हरिष भीमराव वाघचौरे (वय 47 रा. शिव पवन मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, नालेगाव) असे जखमीचे नाव असून सिध्दांत चंद्रकांत वाघचौरे (रा. शिव पवन मंगल कार्यालयाचे पाठीमागे, नालेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
पुतण्याने चुलत्यावर कोयत्याने हल्ला केल्याची ही घटना नालेगाव भागातील शिव पवन मंगल कार्यालयाच्यापाठीमागे घडली. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजता फिर्यादी त्यांच्या घराच्या भिंतीला पाईपलाईनचे काम करत असताना पुतण्या सिध्दांत त्याच्या पत्नीला मारहाण करून घराच्या बाहेर आला. त्याने फिर्यादीची आई साखराबाई भीमराव वाघचौरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्याच्या हातात कोयता होता. त्याने नंतर कोयत्याने हरीश यांच्यावर हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले. जखमी फिर्यादी यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर पोलिसांत धाव घेतली. तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.