Ahmednagar Breaking : नेवासा तालुक्यातील गळनिंब येथील प्रविण डहाळे खून प्रकरणातील ५ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. अशोक उर्फ खंडू किसन सतरकर (रा. गेवराई, ता. नेवासा), ईश्वर नामदेव पठारे (रा. वरखेड ),
शेखर अशोक सतरकर (रा. गेवराई, ता. नेवासा), अरुण उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गनगे (रा. सुरेगाव) व बंडू भिमराव साळवे (रा. बाबुर्डी बेंद, ता. नगर) असे अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले आहे.
फिर्यादी प्रमोद संभाजी कापसे (रा. सुरेगाव) व त्याचा मित्र प्रविण सुधाकर डहाळे (रा. गळनिंब) याचे शेखर सतरकर आणि अशोक सतरकर यांच्यासोबत मागील भांडणाच्या कारणावरुन फोनद्वारे वाद झाले.
तद्नंतर आरोपींनी तलवार, कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने प्रविण डहाळे यास मारहाण करून जिवे ठार मारले. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली. एलसीबी व नेवासा पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपींना तत्काळ गजाआड केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोसई. तुषार धाकराव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, राजेंद्र वाघ, पोहेकॉ. दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार,
पोना. रविंद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, विशाल दळवी, फुरकान शेख, भाऊसाहेब गुंजाळ, रणजित जाधव, अरुण मोरे तसेच नेवासा पोलिस ठाण्याचे पोसई. संदीप ढाकणे, पोना. सुमित करंजकर, पोकॉ. तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.