पारनेर तालुक्यात उपसरपंचासह पाच जुगाऱ्यांना अटक

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथे पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत माजी उपसरपंच सुभाष गाडीलकर याच्यासह पाच जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य तसेच ११ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

गाडीलगाव येथे गेल्या काही दिवसांपासून पत्त्यांचा हार जितचा खेळ खेळला जात असल्याच्या तक्रारी होत्या. पोलिस या जुगाऱ्यांवर पाळत ठेवून होते, परंतु जुगारी त्यांना गुंगारा देऊन जुगार खेळत होते.

रविवारी सायंकाळी गाडीलगाव येथे जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना समजली.

त्यांनी तात्काळ नव्याने दाखल झालेले पोलिस उपनिरीक्षक बोकिल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक गाडीलगाव येथे पाठवले. पथक तेथे पोहचताच जुगाऱ्यांनी तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला.

परंतु पथकातील कर्मचाऱ्यांनी पाचही जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील जुगाराचे साहित्य तसेच रोख रक्कम ११ रुपये हजार रूपये जप्त केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी उपसरपंच सुभाष गाडीलकर, संदीप गाडीलकर, संतोष खोसे, प्रशांत गाडीलकर, बाळू सोनवणे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts