अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह राहुरी तालुक्यातील एका मुलाशी जबरदस्तीने विवाह करण्यात आला आहे.

याबाबत पीडीत मुलीच्या जबाबावरून राहुरी पोलिसात विवाह लावून देणार्‍या नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील एका 17 वर्षे 6 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह 31 जुलै 2020 रोजी राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील दीपक प्रकाश हरिश्चंद्रे (वय 28 वर्षे) या तरुणाबरोबर लावण्यात आला होता.

पीडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिच्या इच्छेविरूद्ध आरोपींनी दीपक हरिश्चंद्रे या तरूणाशी तिचा जबरदस्तीने विवाह लावून दिला होता.

लग्नानंतर पीडीत मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा राहुरी पोलिसात नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे तपास करीत होते.

अपहरणानंतर दि. 29 जानेवारी 2021 रोजी पीडीत मुलगी मिळून आली. तिने दिलेल्या जबाबावरून आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात बालविवाह आरोपी विजय रामदास गाडे,

रामदास चिमाजी गाडे, रवींद्र शंकर गाडे, सतीश भानुदास गाडे सर्व रा. बेलापूर ता. श्रीरामपूर तसेच नवरदेव दीपक प्रकाश हरिश्चंद्रे रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts