अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- दोन दिवसांत अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात पाच पोलीस कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या पाचही बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी एक जणाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
या व्यक्तीच्या संपर्कात इतर चौघे आल्याने त्यांचा रविवारी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समजते. दोन दिवसात तोफखाना पोलीस ठाण्यात पाच पोलीस कर्मचारी बाधित आहेत.
यापूर्वी एक महिला कर्मचारी करोनाबाधित आढळल्या आहे. तर एक सहायक निरीक्षक करोना उपचारानंतर बरे झाले आहेत.
तोफखाना पोलीस ठाण्यात आढळून आलले बाधित अनेकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे सध्या या पोलीस ठाण्यात काहीसे तणावाचे वातावरण आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved