अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषदेतील अंबादास ठाणगे यांचे आज खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
पारनेर बाजार समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण ठाणगे यांचे ते कनिष्ठ बंधू होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा परिषदेसह त्यांच्या आप्तेष्ठ व परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
रविवारी दुपारी त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचे आज निधन झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com