अहमदनगर लाईव्ह24 टीम :- दिवसभराच्या जनता कर्फ्यूनंतर सायंकाळी पाच वाजता नगरकरांनी इमारती येऊन थाळीनाद, टाळ्या, शंखनाद आणि फटाके फोडून गो-कोरोनाच्या घोषणा दिल्या. या थाळीनादमुळे नगर शहर सुमारे ३० मिनिटं दणाणून गेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “जनता कर्फ्यू”चे आवाहन केले होते. या आवाहनाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोदी यांच्या अहवालानुसार सायंकाळी पाच वाजता सर्वांनी घरी बसून टाळ्या वाजवायच्या होत्या. त्यानुसार सायंकाळी पाच वाजताच्या ठोक्याला नगरकरांनी इमारतीच्या टेरेस आणि इमारतीच्या छतावर जाऊन थाळीनाद केला. शहरातील चौकाचौकात लोक जमा होऊन थाळीनाद करत होते. या थाळीनाद मागील शास्त्रीय मीमांसा होत आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट गडद होत चालले आहे. राज्यात दुसरा बळी गेला आहे. संसर्ग झाल्याचा आकडा ३०० जवळपास आला आहे. नगर शहरात करोना विषाणू चे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशात कोरोना विषाणू बाधित मृतांची संख्या पाचवर गेली आहे.